About Author

आज तुझी खूप आठवण आली

आज तुझी खूप आठवण आली,
म्हणून मुद्दामच मोबाइल काढला,
तुझा जुना नंबर शोधून,
बंद असून सुद्धा एकदा तपासून पहिला,

नंबर अनअवेलेबल दाखवत होता,
इथे श्वास सारखा फुलत होता,
का माहित नाही कसतरीच झालेलं,
मनात सारखं काहीतरी चाल्लेल,
हो तिथेच गेलेलो मी,
जिथे पहिल्यांदा भेटलो होतो,
नजरेला नजरा देत,
एकत्र राहणार बोललो होतो,
तू मात्र निघून गेलास
पण मी माझ दिलेलं वचन पूर्ण करते ,
मी अजूनहि तुझी तिथेच वाट पाहतेय,
तू गेल्यावरही तू जवळ असल्याचा भास होतोय...

0 comments:

Post a Comment

News Update :
 
Copyright © 2013. BloggerSpice.com - All Rights Reserved
Author: MohammadFazle Rabbi | Powered by: Blogger
Designed by: Blogger Spice
^