About Author

सांग ना ......


सांग ना ...
समुद्रात तळाशी रंगीबेरंगी मासे
सुखनैव तरंगतात
तसं तुझं असणं माझ्या मनातले


न्याहाळत बसते मी ....
म्हणून ओठांवर नकळतपणे
फुलणारं हसू मात्र 
कुणापासून कसं लपवावं 
समजेनासे होते कितीदा...

आणि ओठांवरचे हसू 
लपवून  ठेवावं तर  
डोळ्यात तरी ते  उमटतेच आणि..

...अशावेळी काय करायचे असतं?
एवढंच नव्हे तर मनात उमटलेला 
हा रोमांच त्याचं काही कराव तर  ..

गालावर उमटलेल्या 
गुलाबी रंगाचा काय रे?...
तुझ्या विरहाच्या गुलाबी काट्याने
घायाळ तरारलेला रक्तबिंदू 
त्याची लाली तरी किती अन
सांग ना कशी झाकायची.....

0 comments:

Post a Comment

News Update :
 
Copyright © 2013. BloggerSpice.com - All Rights Reserved
Author: MohammadFazle Rabbi | Powered by: Blogger
Designed by: Blogger Spice
^