About Author

क्षमा मागितल्याने कोणीही लहान होत नाही


क्षमा मागितल्याने कोणीही लहान होत नाही आपले बोलणे व वर्तनामुळे कुणाची भावना दुखावत असेल, तर त्याची जाणीव होताच क्षमा मागितली पाहिजे. तणाव दूर करण्याचा हा हमखास उपाय आहे. वेळीच क्षमायाचना केली
नाही, तर तणाव निर्माण होऊ शकतो. संबंधांचे गणित असेच काम करते.

दोन व्यक्तींमध्ये वितुष्ट असेल तर त्यांच्यातील संवाद हाच वाद संपवण्याच्या दिशेने सार्थक होऊ शकतो. उत्तम संवादाची सुरुवात आपल्या कृत्याबद्दल क्षमा मागून केली जाऊ शकते. माफी मागून बोलणे यापेक्षा दुसरी चांगली पद्धत नाही. मात्र, लोक माफी मागत नाहीत. ते आपली चूकच कबूल करत नाहीत.

आपण आपल्या चुकांतून बोध घेत पुढे जायला हवे. आपले जीवन व कार्याप्रती उत्तरदायी असण्याची हीच एक चांगली पद्धत आहे. मात्र, या मार्गात अहंहा सर्वात अडथळा ठरतो, जो नेहमी आपण व आपल्या चूक स्वीकारण्यात आडवा येतो. त्यामुळे आपण चूक आहोत, हे माहीत असूनही व्यक्ती ती कबूल करत नाही आणि माफीही मागत नाही.

ज्याप्रकारे क्षमा मागणे कठीण वाटते, त्याचप्रमाणे क्षमा करणेही अवघड आहे. अनेक इतक्या रागीट स्वभावाचे असतात की, एखाद्याची चूक झाल्यास ते त्याला सहजासहजी माफ करण्यास तयार होत नाहीत. हेही चुकीचे आहे. माफी न मागणा-या व माफ न करणा-या, दोन्ही -ºहेच्या व्यक्तींनी हे कधीही विसरू नये की, जीवनात कोणतीही व्यक्ती चूक केल्या शिवाय राहू शकत नाही. त्यासाठी आपल्या चुकांतून बोध घ्यायला हवा. असे न केल्यास तुम्ही आणखी एक संधी गमावत आहात. चुका व संभाव्य चुकीच्या पावलांचे सतत मूल्यांकन करत राहावे. त्यातून काही शिकण्याच्या वा चुका पुन्हा न होऊ देण्याच्या उत्तम व व्यवहार्य पद्धती सापडू शकतात.

तात्पर्य :- क्षमा मागितल्याने कोणीही लहान होत नाही, उलट त्यातून नात्यांतील दुरावा कमी होऊन जवळीक निर्माण होऊ शकते.

0 comments:

Post a Comment

News Update :
 
Copyright © 2013. BloggerSpice.com - All Rights Reserved
Author: MohammadFazle Rabbi | Powered by: Blogger
Designed by: Blogger Spice
^