About Author

हा भास तुझा होताना…

मी स्वत:स हरपून जाते, हा भास तुझा होताना
नसलास जरी समोर तू, वाटते जणू असलेला

स्वप्नात माझ्या येउन हैराण मला का करतो
अन अवचित जाग ही येता, तू असाच भवती विरतो!


वेगाने वाहून वारा, हे केस जेव्हा उडवतो
वाटते मनाला माझ्या, की तूच बटा खेळवतो..

झाडांची अलबेल शाखा ह पदर असा अडवते
ह्र्दय असे धड्धडते जणू तुझीच चाहुल घडते!

पावसांचे अलवार थेंब या ओठांवर ओघळती
वाटॆ तुझाच स्पर्श होई, पण तो ही भासच ठरतो!!

ताटकळत कैक वेळा, वाट तुझी मी बघते
पण तू न ये सामोरा, मन उगा हताश होते !

न कळे मजला क मी, उगाच तुझ्यावर रुसते
मग येता तू सामोरा, गालातच खुद्कन हसते!!

हा भास तुझा होताना…

0 comments:

Post a Comment

News Update :
 
Copyright © 2013. BloggerSpice.com - All Rights Reserved
Author: MohammadFazle Rabbi | Powered by: Blogger
Designed by: Blogger Spice
^