About Author

बहुतेकतरी शेवटची भेट होती ती आमची


बहुतेकतरी शेवटची भेट होती आमची, म्हणूनच तो म्हणाला जाता जाता भेटून जा. खूप आठवण येत असेल म्हणून डोळे भरून पाहून जा. काय होते त्याच्या मनात कळलेच नाहीत्याच्या भेटीसाठी आसुसलेली मी मगजास्त विचार
केलाच नाहीअशीच धावतपळत त्याला भेटण्यासाठी गेले. तो समोर दिसल्यावर पूल तेथेच थांबले. त्याच्या चेह-यावरचे भाव वेगळेच होते. 

जणू त्याच्या मनात काहीतरी लपले होते थोड्यादिवस बाहेर चाललोय ग. असे म्हणून तो निघून गेला. पुढचा प्रश्न त्याने विचारूनच नाही दिला. जाताना फक्त एवढेच म्हणाला,जाणा-या माणसाला थांबवायचे नसते,कुठे चाललाय हेही विचारायचे नसते. त्याच्या शब्दांपुढे मी शांत बसली. तो लवकरच येईल हि आशा ठेऊन बसली. आज ५ वर्ष झाले तो काही परतला नाही. नक्की काय झाले होते ते हि कळले नाही. आजही पावले त्या वळणावर जाऊन अडतात. तो परतणार नाही असेसारखे सांगतात. जणू काही प्रेमाची दुनियाच संपली आमची. बहुतेकतरी शेवटची भेट होती ती

0 comments:

Post a Comment

News Update :
 
Copyright © 2013. BloggerSpice.com - All Rights Reserved
Author: MohammadFazle Rabbi | Powered by: Blogger
Designed by: Blogger Spice
^