About Author

मराठीतच बोला मराठी वाचवा!

*सांयकाळी समुद्रकाठी फ़िरताना एक वृद्धानं एका* लहानग्याला किनार्यावर काहीतरी उचलून समुद्रात फ़ेकताना पाहिलं. आश्चर्य वाटून तो त्याच्या जवळ गेला तर तो समुद्राकाठचे तडफ़डणारे तारामासे एक-एक करुन पुन्हा समुद्राच्या पाण्यात फ़ेकत होता. राहावून त्यानं लहानग्याला विचारलं; समुद्र किनारी इतके हजारो मासे आहेत, तु कुणा कुणाला वाचवू शकणार आहेस??.. मुठभर मासे वाचवून
जगाला असा काय फ़रक पडणार आहे? त्या मुलाने आणखी एक मासा समुद्रात फ़ेकत निरागसपणे उत्तर दिलं, यानं जगाला काय फ़रक पडेल ते माहीत नाही. पण या माशाला विचारा, त्याला काय फ़रक पडला? ज्याचा मी नुकताच जीव वाचवला.


मी एकट्याने, मराठी माणसाकडुन खरेदी केल्याने किती मराठी शेतकर्यांचे जिव वाचणार आहेत? मी एकट्याने, मॊल्स मधुन खरेदी न केल्याने किती मराठी व्यापार्यांचे जिव वाचणार आहेत? मी एकट्याने, मराठी माणसाच्या पेट्रोल पंपावर, पेट्रोल घेतल्याने किती मराठी जनतेवर सुपरिणाम होणार? मी एकट्याने, डान्स बार मधे पैसे न ऊडविल्याने, किती मराठी माणसे श्रीमंत होणार? मी एकट्याने, मराठी माणसा कडुन फ़्लॆट / जमीन विकत घेतल्याने किती मराठी बिल्डर / कॊन्ट्रॆक्टरांची भरभराट होइल? मी एकट्याने, विज वाचवल्याने किती अंधारलेल्या घरांमधे प्रकाश पडेल?

मी एकट्याने, पाणी बचत केल्याने किती, तहानलेल्या जिवांना पाणी मिळेल? मी एकट्याने, मराठी किराणा दुकानदाराकडुन, किराणा खरेदी केल्याने, किती मराठी दुकानदार [जिवघेण्या] स्पर्धेत टिकुन रहातील? मी एकट्याने, मराठी मालकाच्या हॊटेल मधुन खरेदी केल्याने, किती मराठी हॊटेल मालकांना याचा फ़ायदा होणार? मी एकट्याने, मराठी माणसाचा पेपर वाचल्याने किती मराठी पेपरमालकांचा धंदा वाढणार आहे? कृपया, वर लिहिलेली गोष्ट, कथा, परत एकदा वाचावी....

माझा विचार मासे आणि माणसा मध्‍ये फरक आहे ते म्‍हणजे की मास्‍यांना जाती नसते आणि आपण भाषा, मराठी, जाती वैगेरे मध्‍ये पडतोत हे बरोबर आहे का? माझा एकच प्रश्‍न आहे आपल्‍या लोकांशी की आपण जर उद्या आजारी पडलो तर काय आपण मराठी गैर मराठी यांचा विचार करून डॉक्‍टर हेच्‍या कडे जाणार का? आणि जर का आपण दुस-या (गैर मराठी) डॉक्‍टरकडे गेलो तर तो पण हेच विचार केला तर काय होईल?

जरा लक्ष द्यावे माझ्या विचारांकडे आणि मराठी वैगेरे चा विचार सोडून फक्‍त माणूस आहे का हे विचार करावा. कारण माणूसच माणसाच्‍या कामाला येतो. मराठी वैगेरे कोणी आपल्‍या कामाला येत नाही.

जर हेच विचार करयेच आहेत तर आपण जगू शकतच नाही हे माझा आपल्‍याला चुनौती आहे कारण एक दिवस सुद्धा आपण गैर मराठी माणसा शिवाय जगू शकणार नाहीत. सकाळी उठल्‍यापासून ते झोपे पर्यंत आपल्‍या टूथ ब्रश, टूथ पावडर, टूथ पेस्‍ट पासून रात्री झोपतांना लागणारी पान, सुपारी, बिछाना, गादी इत्‍यादी सुद्धा गैर माणसानीं बनवलेली असते का नाही हे आपल्‍याला माहित आहे का? म्‍हणून माणसांचा विचार करा? काय तुम्‍ही एक दिवस मराठी माणसा करता जगू शकता का?

हे विचार माझे आहेत आणि हे मी आपल्‍या आयुष्‍याच्‍या कडू आणि गोड अनुभवा वरून शिकलो आहे. मराठी माणसांना काम द्या शिक्षण द्या मी हे बरोबर आहे पण फक्‍त मराठी माणसां करता जगतो हे बरोबर नाही.

0 comments:

Post a Comment

News Update :
 
Copyright © 2013. BloggerSpice.com - All Rights Reserved
Author: MohammadFazle Rabbi | Powered by: Blogger
Designed by: Blogger Spice
^